‘मुळशी पॅटर्न’ : वाढत्या शहरीकरणाचं दाहक वास्तव
खरं तर हा एका मोठ्या कादंबरीचा विषय, पण तो त्याआधीच ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर अवतरला आहे. लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी वाढत्या शहरीकरणाच्या दुष्परिणामाचं हे दाहक वास्तव मोठ्या पडद्यावर मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. चित्रपटात शेतकऱ्यांच्या व्यथा, वैफल्यग्रस्त तरुण पिढी, बिल्डर्स लॉबीचा उन्माद, गुन्हेगारी, हिंसाचार आणि हतबल झालेले पोलीस असा मोठा कॅनव्हास आहे.......